उलवे नोडमध्ये उभा राहणार शिव छत्रपतींचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा !

0
122

शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रतिमेचे पूजन

पनवेल – उलवा नोडमधील खारकोपर रेल्वे स्टेशन जवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्या जागेवर शिवजयंती साजरी करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
जेथे शिवसृष्टी व शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे त्याप्रत्यक्ष जागेवर आज जाऊन प्रतिमेचे पूजन माजी खासदार तथा समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, प्रकाश भगत, विश्वनाथ कोळी, वसंत म्हात्रे, गव्हाण सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, न्हावा सरपंच हरेश म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, अमर म्हात्रे, किशोर पाटील, संजय भगत, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
स्व. जनार्दन भगत साहेबांच्या संकल्पनेतून १९८१ साली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारला गेला व तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांच्या हस्ते, तसेच स्वर्गीय दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील, एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत अर्धपुतळ्याचे अनावरण संपन्न झाले होते. या पुतळ्यास आता तब्बल ४० वर्ष होत आहेत. गव्हाण विभागातून एस्सार, ओ. एन. जी. सी. माझगांव डॉक, १९८४ सालचा गौरवशाली – शौर्यशाली लढा व अनेक लढ्यांचे नेतृत्व करताना स्व. जनार्दन भगत साहेबांनी कोपर फाट्यावरील शिव छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून अनेक लढे यशस्वी केले व कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून दिला. अनेक लढ्यांचा साक्षीदार असलेल्या पुतळ्याची ४१ वर्ष सातत्याने ऊन पावसाचा परिणाम होऊन क्षति झालेली आहे. म्हणून गव्हाण विभागातील शिवछत्रपती स्मारक व उत्सव समितीचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, श्री. महेंद्र घरत यांनी छत्रपतींचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा नव्याने विकसित होत असलेल्या उलवा नोड मध्ये उभा करण्याचा संकल्प मांडला व सिडको व्यवस्थापनाबरोबर अनेक वर्ष संघर्ष करून खारकोपर स्टेशन समोर सव्वा सहा एकर जागा मंजूर करून घेतली. यामध्ये सिडकोचे तत्कालीन चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. लवकरच या जागेवर शिवसृष्टी व शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

             या विभागात भव्य दिव्य स्वरूपाची शिवसृष्टी हे स्वप्न होते. त्याची लवकरच पूर्ती होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर जी जी स्वप्न पाहतात ती ताकदीने पूर्ण करतात. आपल्याला अभिमान आहे कि, ते आपल्या विभागाचे भूमिपुत्र आहेत. भगतसाहेबांनी मंदिरे बांधली त्यांना सन्मानाने कलश चढविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. रयत शिक्षण संस्था, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था यांना पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. भगतसाहेबांना आणि सर्वाना अभिमान वाटावा असे कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.                                                                                                                – कामगार नेते महेंद्र घरत