रायगडच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फुट दरीत कोसळली

0
166

पाली/बेणसे :
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने येत जात असतात. शिवजयंतीनिमित्त . शनिवारी दि.(19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फुट दरीत कोसळली. ही घटना सकाळी साडेतीनच्या सुमारा घडली असून वरंध घाटात अपघात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. अपघातामध्ये तीघेजण एकाच मोटारसायकलवर होते. गाडीवर संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे. तिघांनाही महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अशा घटना घडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी दु:ख व्यक्त कऱण्यात येत आहे. कालपासून महाराष्ट्रात अशा अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 हे तरूण गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यावेळी घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी त्यांना जवळच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात केले. एकाला किरकोळ लागले असल्याने प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे, दोघेजण तिथल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेली माहिती भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट निघालेल्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला. मोटर सायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 सर्व राहणार भोंगवली तालुका भोर अशी जखमींची नाव आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असुन एकाला प्रथोमोपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले असल्याचे तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.