“नव्याने सुशोभीकरण झालेला वडाळे तलाव अस्वच्छतेच्या मार्गावर,”

0
2775

कचरा पसरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीन-अप मार्शल ठेवण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी.

        पनवेल : नव्याने नूतनीकरण झालेल्या वडाळे तलाव येथील परिसरात रात्रीच्या वेळी पनवेलकर नागरिक मोठ्या संख्येने चालण्यासाठी येत असतात . अशावेळी त्या ठिकाणी सोबत येताना पाण्याच्या बाटल्या, इतर खाद्यपदार्थच्या वस्तू घेऊन येतात . तसेच त्या परिसरात तरुण वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळी उपस्थित असतो.आपल्या मित्र परिवारातील लोकांचे वाढदिवस सुद्धा तिथे साजरे केले जातात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी तिथे सतत होत असतात.

 विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सुरक्षेच्यादृष्टीने वेळोवेळी सूचना केल्या होत्या त्यापैकी काही अमलात सुद्धा आल्या आणि काही प्रगतीपथावर आहेत. परंतु  पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,खाद्यपदार्थांचे प्लास्टिकच्या थैल्या कागदी बॉक्स, केकचे रिकामे बॉक्स अशा प्रकारचा कचरा नागरिक तिथेच टाकतात  किंवा तळ्यामध्ये फेकतात. येथील जॉगिंग ट्रॅक वर कुत्रे आणि मांजरी सर्रासपणे नागरिक फिरवण्यासाठी घेऊन येतात आणि त्यांच्या मार्फत केली गेलेली घाण ही त्या ट्रॅकवरच असते त्यामुळे इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो, या अशा नागरिकांना जरब बसावी म्हणून त्यांनी पनवेल महानगर पालिकेच्या क्लीन-अप मार्शल च्या मार्फत सायंकाळच्या वेळी येथे गस्त ठेवून सदर कचरा पसरवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तेथे स्वच्छता राहण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली आहे. या चांगल्या सवईसाठी नागरिकांकडून सुद्धा सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी पालिकेला सांगितले.

पनवेल शहरातील  वडाळे तलावाला ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी  मी आणि आमच्या नगरसेविका डॉ.सौ सुरेखा मोहोकर, सौ.प्रीती जॉर्ज त्या ठिकाणी पाहणी साठी जात असतो आणि नागरिकांच्या सूचनेनुसार  वेळोवेळी पाठपुरावा करून तिथे आवश्यक ते बदल करून घेत असतो. नागरिकांना आवश्यक त्या सोयी आपण तेथे केल्या. परंतु काही तरुण आणि इतर नागरिकां मार्फत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तेथे येणाऱ्या नागरिकांना होत आहेत अशी तक्रार माझ्याकडे तेथील जेष्ठ नागरिक आणि काही महिलावर्गा मार्फत आली. त्यावर त्या परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांना जरब बसावी म्हणून मी  ही सूचना केली आहे                               :- प्रितम जनार्दन म्हात्रे (विरोधी पक्ष नेता, पनवेल महानगरपालिका)