महाराष्ट्र दिनी पनवेलमध्ये “जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे कलारसिकांना कार्यक्रमाची मेजवानी”

0
347

        पनवेल : जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि सरगम संगीत अकॅडमी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल मधील हौशी कलाकारांनी एकत्र येऊन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये “परंपरा महाराष्ट्राची” या संगीतमय सुरांची मेजवानी ठेऊन पनवेल करांसाठी एक आगळी वेगळी भेट देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमा संदर्भात माहिती देताना सरगम संगीत अकॅडमी चे श्री नरेश पाटील यांनी सांगितले पनवेलमधील विविध क्षेत्रातील मग ते राजकारण, वैद्यकीय क्षेत्र अभियंता क्षेत्र गृहिणी शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हौशी कलाकारांना एकत्र घेऊन आम्ही आमच्या सरगम संगीत अकॅडमी च्या माध्यमातून पनवेल करांसाठी महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा मराठमोळा कार्यक्रम परंपरा महाराष्ट्राची हा करू इच्छितो ही संकल्पना आम्ही विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडे मांडली. या कार्यक्रमाला नृत्य दिग्दर्शन सुद्धा पनवेल मधीलच त्या क्षेत्रातील सौ मिताली पारंगे सौ अमृता भेरे श्री विनोद पाटील हे करणार आहेत. अशा प्रकारचे स्थानिक विविध क्षेत्रातील हौशी कलाकारांना घेऊन पनवेल मध्ये प्रथमच एक आगळा वेगळा उपक्रम होत आहे. या कार्यक्रमामध्ये पनवेलमधील 80 पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत महाराष्ट्र दिनानिमित्त दिवसाची सुरुवातच सकाळी आठ वाजता या कार्यक्रमा च्या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने होणार आहे . या कार्यक्रमांमध्ये आपण महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि नृत्य व गीते सादर करणार आहोत त्यामध्ये वारकरी दिंडी गोंधळ जोगवा भारुड वाघ्या मुरळी आदिवासी नृत्य धनगर गीत कोळी गीत पोवाडा तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक सणांचे दर्शनाचा नजराणा कलारसिकांना सादर होणार आहे. सदरचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी विनामूल्य असून मर्यादित आसन व्यवस्था असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल असे सांगण्यात आले.

पनवेल मधील विविध क्षेत्रातील हौशी कलाकार एकत्र येऊन पनवेल करांसाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परंपरा महाराष्ट्राची हा कार्यक्रम करू इच्छितात. या अशा लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभाग असणाऱ्या हौशी पनवेलकर कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने माझ्या जे. एम. चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पनवेल करांसाठी एक संगीत आणि नृत्याची कला रुपी मेजवानी सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पनवेलकरांनी या सर्व कलाकारांना उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे असे मी सर्वांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देतो :-
प्रितम जनार्दन म्हात्रे,
अध्यक्ष जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था