केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे संघर्ष समितीच्यावतीने आभार

0
182

नवी मुंबईच्या विकासात असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान आणि स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नामकरणाचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत उभारलेल्या लढ्याला पाठींबा व शासनदरबारी सहकार्य करणारे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आभार मानले.  यावेळी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, जे. डी. तांडेल, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे व इतर