उदय सामंत रायगड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

0
480

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उदय सामंत हे रायगड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील , ह्या आधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कु. अदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचे काम पहिले, उदय सामंत यांच्याकडे रायगड सह रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. तर , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतेही पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही.

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर