आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागावे – महेंद्रशेठ घरत

0
8

महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न

उलवे : ‘सुखकर्ता’ येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी नवनियुक्त विधानसभा प्रभारी यांनी आगामी काळात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याशी विचारविनिमय करून काॅंग्रेस पक्षाची विचारधारा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “सर्वांना सोबत घेऊन काॅंग्रेस बळकट करण्यासाठी हातात हात घालून काम करायचे आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मी खंबीरपणे आपणा सर्वांच्या पाठीशी उभा आहे. नव्याने नियुक्ती झालेल्या सर्व प्रभारीना सहकार्य करायचे आहे.”
या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सर्व आढावा घेऊन पदाधिकारी यांची मते जाणून घेतली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा प्रभारी म्हणून कर्जत विधानसभा -नारायण आंबेकर, (चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश) उरण विधानसभा- डॉमिनीक डीमेलो. (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) पेण विधानसभा -मनोज कांबळे,( सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) अलिबाग विधानसभा – प्रदीप राव, (चिटणीस – महाराष्ट्र प्रदेश )श्रीवर्धन विधानसभा- अशोक मोरे, (चिटणीस महाराष्ट्र प्रदेश,) महाड विधानसभा- सुरेश कातकर (रत्नागिरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि ‘परदेश प्रवासाची पंचविशी’ आणि ‘जय शिवराय’ ही पुस्तके भेट देऊन स्वागत केले.
यावेळी उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, कर्जत तालुका अध्यक्ष संजय गवळी, खालापूर तालुका अध्यक्ष देविदास म्हात्रे,माणगांव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, महाड तालुका अध्यक्ष अफजल चांदले,रोहा तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख,युवक जिल्हा अध्यक्ष निखिल डवले, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन,ओबीसी पनवेल अध्यक्ष वैभव पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष किरीट पाटील,तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.