पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबीर

0
3

पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पनवेल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, जयंत पगडे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, राजेश भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल पूर्व तालुका मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक बबन मुकादम, अजय बहिरा, रवींद्र भगत, राजेंद्र शर्मा, रवींद्र जोशी, रविनाथ पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कामगार मोर्चा प्रदेश सचिव संजय भगत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे,विद्या तामखेडे, अमित ओझे, सुशील शर्मा, विनोद घरत,अनेश ढवळे, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, विश्वजीत पाटील, यतीन पाटील, देवांशू प्रभाळे, तेजस जाधव, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराला रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी रक्तदात्यांचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य माणसाचा आणि देशाचा विकास हाच उद्देश घेऊन भाजप काम करत आहेत. देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्यात लाडके देवाभाऊ काम करत आहेत. आपण पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तळागाळातील घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करून त्यांच्या विकासासाठी कायम काम करत राहू या. – भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण