नवीन पनवेल सिडको कार्यालयातील अधीक्षक अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

0
3435

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पनवेल  – सिडको कार्यालयातील दुरुस्ती कामाच्या बिलमंजुरी करीत आवश्यक असणाऱ्या अंतर्गत गुणवत्ता तपासणी अहवाल वर सही करण्याकरिता १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लोकसेवक अधीक्षक अभियंता सिडको कार्यालय नवीन पनवेल  प्रकाश बालकदास मोहिले व त्यांचे सहकारी सेवानिवृत्त सहा. कार्यकारी अभियंता संजय हरिभाऊ डेकाटे यांना ठाणे लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले.
नवीन पनवेल सिडको कार्यालयाच्या संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कामाच्या बिलमंजुरी करीता आवश्यक असणाऱ्या अंतर्गत दुरुस्ती तपासणी अहवालावर स्वाक्षरी कारिण्यासाठी आरोपी अधीक्षक अभियंता प्रकाश बालकदास मोहिले यांनी तक्रार दार सबकॉन्ट्रक्टर यांच्या कडे पंधरा हजार रु. लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या कडे रीतसर तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ठाणे पथकाने सापळा रचला असता दि. २३-०९-२०२२ रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयातच अधीक्षक अभियंता प्रकाश मोहिले व त्यांचे सेवानिवृत्त सहकारी डेकाटे यांना तक्रारदार यांच्याकडून १५००० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि यशस्वी कारवाई करण्यात आली असून खांदेश्वर पोलीस ठाणे येथे या संबंधी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.