चिरनेर गावात हाहाकार; ३५० च्या वर घरात शिरले पुराचे पाणी

0
36

              उरण : अतिवृष्टीचा फटका हा ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाला बसला असून गावातील सुमारे ३५० च्या वर घरात पुराचे पाणी शिरण्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.रात्रीच्या सुमारास ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे गावात एकच हाहाकार माजला आहे.अनेक रहिवाशांच्या जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू,फँनिचर ही पाण्याखाली गेल्याचे भयानक चित्र समोर येत असताना रहिवाशी हे आप आपल्या कुटुंबासह शेजारी मंडळींचे जीव वाचविण्यासाठी रात्रीच्या अंधारा

त धडपडत होते मात्र उपाययोजना करण्यासाठी सज्ज असणारी आपत्कालीन प्रशासनाला जागच न आल्याने रहिवाशांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे.

 

           उरण तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.चि

रनेर ते मोठी जुई आणि विंधणे ( कंठवली) ते वेश्वी हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका हा ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाला बसला असून गावातील सुमारे ३५० घरात पुराचे पाणी शिरण्याची घटना घडली आहे.यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावात ओढव

लेल्या अस्मानी संकटामुळे एकच हाहाकार उडाला.गावातील रहिवाशांच्या घरात चार ते तीन फूटापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने रहिवाशी हे आप आपल्या कुटुंबासह शेजारी मंडळींचे जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात धडपड करत होते.भेंडखळ, म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ही पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे.

मात्र या पुर परिस्थितीची माहिती रहिवाशांनी आपात्कालीन प्रशासनाला दिल्या नंतर ही तातडीने उपाययोजना करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी,मंडळ अधिकारी तसेच संबंधित शासकीय खात्याचे अधिकारी तातडीने उपस्थित न राहिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती.सकाळी उरण तहसील कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी चिरनेर गावात आले असता त्यांना मात्र रहिवाशांच्या रोष्याला सामोरे जावे लागले. याच दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यांला भुरळ येताच संकटग्रस्त रहिवाशांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचाऱ्यांला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.