मुरूड तापले : पारा 36 पार

0
16

कोर्लई : होलिकोसत्व,रंग पंचमी समाप्त झाल्यानंतर हवेतील उष्णतेचे प्रमाण वाढते असून येत्या 24 तासात उष्णतेचे लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.सध्या दुपारी रस्त्यावरून चालताना किंवा दुचाकीने जाताना उष्णतेच्या झळा लागत असून तापमान 36 वर पोहोचले असून तीव्रता वाढती आहे.हवामान खात्याचे अनुमाना नुसार मध्य महाराष्ट्र,कोकण आदी भागात उष्णतेची तीव्रता वाढती राहील.रविवारी मुरूड तालुक्याचा तापमान पारा 36 वर पोचला आहे.असह्य उकाड्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

समुद्रकिनारी असणाऱ्या मुरूड तालुक्यात सध्या  तापमानाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जाणवत आहे. पर्यटकांचा शुकशुकाट दिसत असून पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. मुरूड तालुक्याचे तापमान 35 ते 36 सेल्सियस वर गेले आहे. पश्चिमेकडून समुद्र किनारी देखील गरम हवेच्या वाफा वाहत आहेत.समुद्रकिनारी भागातील हवेत मिठाचे प्रमाण असल्याने दमट हवामान नेहमी असते.विशेषतः उन्हाळ्यात शरीराच्या अंतर्गत भागात घाम येऊन दुर्गंधी येते. खाज येऊन व्यक्ती हैराण होतो.कोकणात उष्णतेची लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी दुपारच्या रखरखीत उन्हात जाऊ नये, छत्री, टोपीचा वापर करावा, कामाशिवाय  दुपारी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. डांबरी रस्ते जबरदस्त तापून त्याची गरम वाफेचा त्रास दुचाकीस्वारांना होताना दिसत आहे.

आधिक वेळ अशा  कडक उन्हात काम करीत राहिल्यास   उष्माघाताची शक्यता असते.  स्ट्रोक येऊ शकतो.रक्त दाब देखील अचानक वाढू शकतो. होळी च्या दिवशी जळगाव शहरात अचानक उष्माघाताने 55 वर्षीय रिक्षा चालकाचा रिक्षा चालवीत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अति उष्णतेमुळे मानवी शरीरातील अववय निकामी होऊन हा मृत्यू येतो असे डॉक्टर्स सांगतात.उष्माघात यालाच म्हणतात.उन्हाळी दिवसात लिंबू पाणी, शहाळी, कलिंगड, सब्जा चे सरबतांचे सेवन करावे.उष्ण वस्तू सेवन करू नयेत, भरपूर पाणी प्यावे.विनाकारण बाहेर जाणे टाळावे, चक्कर येणे, डोके दुखणे,उलट्या होणे अशी उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत.आधिक माहिती घेता असे कळते की, राजस्थान, गुजरात राज्यात उष्णतेचा पारा 42 वर गेला आहे.महाराष्ट्रात रविवारी सोलापूर जिल्ह्यात तापमान पारा  42.5 इतका पोहचला आहे. राज्यात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून आरोग्य विभागाची  उष्ण लाटेचा सामना करण्यासाठी सज्जता झाली आहे.