उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वाणवा

0
7

उरण : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वाणवा पाहायला मिळत आहे.यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, रुग्णांना मेडिकल मधून औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे येथील गोरगरीब गरीब जनता त्रस्त झाली आहे.

गोरगरीब  रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे  म्हणून शासनाने  जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. गोरगरिबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये, व त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावा म्हणून आरोग्य विभागाकडून ४०० पेक्षा  अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवला जातो. मात्र, उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या-औषधांचा वापर रुग्णांसाठी होत आहे.गेल्या काही दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा पाहायला मिळत आहे एकतर डॉक्टरांची कमी त्यात औषधांचा तुटवडा यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. सध्या औषध उपलब्ध नाहीत नंतर येतील त्यामुळे बाहेरून औषधे विकत घ्या असे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत  आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असणाऱ्या भोंगळ कारभारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांचा जीव टांगणीला लागला असून प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था रोज मेरे त्याला कोण रडे अशी झाली असेल तर गोरं गरीबांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सदर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.