पनवेल : भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मंगला माळवे, स्वरूप खारगे, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान गीते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, माजी नगरसेवक , विविध पक्षाचे पदाधिकारी , महापालिकेचे अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी वाहन विभागाच्या ड्रायव्हर केबीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या १० शाळांमध्येही ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे शिक्षक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत अवयव दानासाठी नोंदणी केलेल्या दात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकने तयार केलेल्या ‘कर-मित्र’ चॅटबॉट चे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.