
उरण :
जेएनपीए,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि बिव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीए मध्ये अत्याधुनिक शिक्षण व विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.या केंद्रामुळे लॉजिस्टिक कौशल्यविकास क्षेत्रात एक मह त्वाचा टप्पा ठरणार आहे. या केंद्रात पाच वर्षाच्या कालावधीत २५ हजारांहून अधिक एचएमव्ही/एल एमव्ही चालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना निवासी व गैर-निवासी स्वरूपात मोफत,जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम जेएन प्राधिकरण प्रशासन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जेएनपीए बंदराचे अध्यक्ष व व्हिपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक उन्मेष वाघ उपस्थित होते. यावेळी जेएनपीए भारताच्या सागरी क्षमतांना अधिक बळकटी देऊन आपला जागतिक पातळीवरील व्यापार वाढविण्यासाठी सज्ज आहे.
कौशल्यविकास आणि बंदर भेटीद्वारे सागरी क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही आम्ही विशेष भर देणार आहोत. जेणेकरून भारताच्या सागरी क्षमतांचा विकास होईल व पुढील पिढीला प्रेरणा मिळेल असे मत यावेळी उन्मेष वाघ यांनी व्यक्त केले. या केंद्रात पाच वर्षाच्या कालावधीत २५ हजाराहून अधिक चालक व सहाय्य्क कर्मचाऱ्यांना निवासी व गैर-निवासी स्वरूपात मोफत,जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल.