लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जपली कायम सामाजिक बांधिलकी

966
4085

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप सुरु

पनवेल :  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमाला आजपासून (सोमवार, दि. २४) सुरुवात झाली.

 भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाटप कार्यक्रमाला विभागनिहाय सुरुवात झाली.

        राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही.  सदैव आपल्याकडून कशी मदत होईल याचाच त्यांनी विचार केला. त्यामुळे लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम करीत आले आहेत.  महापूर असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच मदतीतून सर्वसामान्यांना आधार दिला आहे. कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करत देवदूताप्रमाणे त्यांनी प्रामाणिक कार्य केले. त्यामुळे कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही कोरोनावर मात करण्यासाठी मोलाची भूमिका बजाविणारे सेवाव्रती देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेले कार्य संस्मरणीय आणि अग्र स्थानावर राहिले आहे.

      कोरोना महामारी मध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना मागील वर्षात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दिड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहिम, आर्थिक मदत, याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणपती सण गोड करण्यासाठी ६० हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य, अशी हरएक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमे राबविले जातात. मात्र या वर्षीही कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रमे होणार नसले तरी समाजोपयोगी उपक्रम सुरूच राहणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये गोडेतेल, चवळी, तुरडाळ, साखर, कांदे आणि बटाटी या रेशन साहित्याचा समावेश आहे. २३ मे पर्यंत ७२ हजार ८४७ रेशन किट तयार झाले असून त्याचे वाटप आजपासून सुरु झाले आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मधल्या काळात कोरोनाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे यंदा ७० वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या अनुषंगाने नियोजन सुरु होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला, त्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गावोगावी सुरु झाले आहे.                                                   – अरुणशेठ भगत, तालुकाध्यक्ष- भाजप.