भात खरेदी विक्री करत असताना शंभर टक्के मोबदला पैसे खात्यावर जमा

0
113

पनवेल :  शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ निष्ठावंत नेते, पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचे चेअरमन एम सी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात भात खरेदी विक्री करत असताना शंभर टक्के मोबदला पैसे खात्यावर जमा करण्यात एम सी पाटील व संचालक मंडळाला यश आले आहे. याबद्दल पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचे नाव रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यात त्यांना यश लाभले आहे.आणि भविष्याच्या काळात पनवेलची भातगिरणी आपल्या महाराष्ट्रात नंबर वन ला आणण्यासाठी भातगिरणीचे सभापती एम सी पाटील, उपसभापती राजेंद्र घरत व सचिव संदीप केणी यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पेमेंट करुन त्यांचा भात खरेदी करून शासनाच्या कार्यालयात पाठवण्याची मानसिकता पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचे चेअरमन एम सी पाटील यांनी तशी बोलताना माहिती दिली.

         आतापर्यंत पनवेल तालुक्यातील सहकारी भातगिरणीचे काम बघुन शेकापक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील  व शेकापक्षाचे जेष्ठ नेते कार्यसम्राट मा.आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे , शेकापक्षाचे जेष्ठ नेते व मा.तालुका चिटणीस नारायणशेठ घरत , मा.सभापती काशीनाथ पाटीलवि रोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकापक्षाचे पमपा जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडु, शेकापक्षाचे तालुका चिटणीस मा.उपसभापती राजेश केणी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच संपूर्ण पनवेल तालुक्यातुन सर्व सामान्य शेतकरी व त्यांचे कुटुंबीय तसेच शेकापक्षाचे सर्व नेतेमंडळी पदाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते यांनी सुद्धा संपूर्ण संचालक मंडळाचे कौतुक केले आहे.