पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या ७ वर्षाच्या निष्क्रिय कारकीर्द निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले, यामध्ये जीएसटी, वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ, तीन काळे कृषी कायदे,नोटबंदी, कोरोना रोखण्यात अपयश, लसीचा तुटवडा अशा अनेक बाबतीत अपयश आलेल्या भाजपा सरकारचा निषेध पनवेल शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
यावेळी आर सी घरत जिल्हाध्यक्ष पनवेल, सुदाम पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा, ताहीर पटेल कार्याध्यक्ष, महादेव कटेकर तालुकाध्यक्ष, हेमराज म्हात्रे युवा जिल्हाध्यक्ष, निर्मला म्हात्रे महिला जिल्हाध्यक्षा, लतीफ शेख शहर अध्यक्ष पनवेल, शशिकला सिह उपाध्यक्ष, आदित्य सावळेकर प्रदेश सरचिटणीस युवा, शशिकांत बांदोडकर जिल्हा उपाध्यक्ष, नंदराज मुंगजी जिल्हा उपाध्यक्ष, अमित लोखंडे जिल्हाध्यक्ष मजदूर, विश्वजित पाटील विधानसभा अध्यक्ष युवा, विनीत कांडपिळे जिल्हाध्यक्ष व्यापार सेल, प्रवीण कांबळे प्रदेश संयोजक अनु जाती, अरुण कुंभार विधी सेल, बबन केणी जिल्हा सह चिटणीस, विजय केणी, राकेश चव्हाण, आरती ठाकूर, राहुल जानोरकर, अंकुश गायकवाड, जयेश लोखंडे, शाहिद मुल्ला, नीता शेनोय, अनुपमा सिह, सोनिया सहोटा, सायरा मॅडम, अभिजित मुडकल, श्री मोडक, श्री विल्यम्स, सुरेश खोसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुदाम पाटील कार्याध्यक्ष व प्रवीण कांबळे यांनी केंद्र सरकारच्या निष्क्रीयतेचा पाढा वाचला व आभार प्रदर्शन हेमराज म्हात्रे यांनी मानले