कोलाड -भिरा मार्गावर अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू 

0
211

कोलाड भिरा मार्गावर सुतारवाडी नाक्याजवल शनिवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विले एमआयडीसीमध्ये कॉइल घेऊन जाणारा ओवरलोड ट्रेलरची केबिन व मागचा हावदा वेगळा होऊन गेली 5 दिवस सुतारवाडी नाक्याजवलील रस्त्यावर बंद अवस्थेत पडलेला आहे. शनिवारी संध्याकाळी 07:30 च्या सुमारास कुडली येथून मोटारसायकलने कोलाड कडे जाणारे घनश्याम श्रीकांत सरफळे यांना रात्रीच्या अंधारात ट्रेलर कॉइल चा बंद पडलेला हावदा दिसून न आल्याने मोटारसायकल याट्रेलरच्या मागच्या बाजूस धडकली गेली. या भीषण अपघातात घनश्याम सरफळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे.
कोलाड भिरा मार्ग अरुंद असून या रस्त्यावर नेहमीचं पोस्को कंपनी कडून कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर वाहनांची वर्दळ असते. बंद पडलेला ट्रेलर वेळीच काढला असता तर सरफळे यांचा जीव वाचला असता, पोस्को कंपनीचे ट्रेलर अजून किती जणांचे बळी घेणार असा संतप्त सवाल याभागातील नागरिक उपस्थित करीत आहेत.