खा.सुनील तटकरे यांनी केली मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी

0
187

संबंधीत ठेकेदार व अधिकारी वर्गाला काम मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना

रोहा :  पावसाळा सुरू झाल्याने मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर चौपदरी करणाचे काम देखील गेले कित्येक वर्षे रखडले असल्याने यासमस्येची दखल घेत कोकणचे भाग्यविधाते तथा यायगडचे लोकप्रिय खा सुनील तटकरे यांनी सोमवारी यामार्गाची पाहणी करून संबंधीत ठेकेदार व अधिकारी महामार्गाचे रखडलेले बांधकाम व ठिकठिकाणी पडलेले खड्डे लवकरच पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई- गोवा महामार्ग हा कायम रहदारीचा मार्ग असून, या मार्गावरून रोजचं शेकडो वाहने येथून मार्गक्रमण करीत असतात. सद्यस्थितीत या मार्गाची सर्वच ठिकाणची अवस्था अत्यंत बिकट व दयनीय झाली आहे. येथे ठिकठिकाणी पडलेल्या भल्यामोठ्या खड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तर या पडलेल्या खड्ड्यांमुले अनेक प्रवाश्यांना आपला नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच महामार्गावरील असलेले छोटे पूल, पुई येथील मोरी, व कुंडलिका पूल येथे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने वारंवार खडे पडत आहेत.या खड्यात पाणी साचून राहत असल्याने याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गासह वाहनचालकांना होत आहे. तर या मार्गावरी कोलाड ते खांब परिसरात बहुतेक कामे अर्धवट असल्याने या पार्श्वभूमीवर मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी व आंबेवाडी नाका येथील डोकेदुखी ठरत असलेली गटार लाईन व खांब येथील महामार्ग व पादचारी पूल यांची खा. सुनील तटकरे हे कोलाड व खांब येथे प्रत्यक्ष येऊन या मार्गाची पाहणी करून संबंधीत ठेकेदार व अधिकारी वर्गाला लवकरात लवकर काम मार्गी लावून खडडे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्या समवेत आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, पुईचे माजी सरपंच संजय मांडलुस्कर, महिला अध्यक्षा प्रितम पाटील, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,खांब उपसरपंच मनोज शिर्के, आंबेवाडी उपसरपंच श्रीकांत चव्हाण, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, संजय राजिवले, सुशील शिंदे, नरेंद्र जाधव, संतोष टवळे, महादेव सानप, योगेश टवळे, योगेश धामणसे, दत्ता वातेरे, सुमित जाधव, महेश टवळे तसेच आंबेवाडी व खांब ग्रा.पं.सदस्य तसेच विभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.