पनवेल : को.ए.सो विठोबा खंडाप्पा शाळेला तसेच इंदूबाई वाजेकर शाळा, केशवजी विरजी कन्या शाळा व व्ही.के. ज्युनियर कॉलेजला विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भेट देऊन शालेय शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या!
आपल्या शिक्षणाच्या तालमीत तयार झालेल्या विद्यार्थ्याची त्यांच्या सामाजिक क्षेत्रातल्या कार्यामुळे आज शाळा समिती सदस्यपदी निवड झाली हेच आम्ही विद्यार्थ्यांवर घडविलेले संस्कार आहेत भविष्यात तुमची अशीच प्रगती होवो असे शब्दरूपी आशीर्वाद प्राचार्यां पी.बी.ठाकूर सर यांनी दिले.
को. ए. सो. व्ही. के. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पनवेल यांनी इ.१० वीच्या निकाला नंतर को.ए.सो. विद्यासंकूल पनवेल च्या व्ही.के. हायस्कूल, के.व्ही. कन्या शाळा, व इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळा या शाळेमधील इयत्ता १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा व ११वी आँनलाईन प्रवेश प्रक्रिया बाबत विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सभांचे आयोजन केले होते. यावेळी ,CET परीक्षा व ११ वी आँनलाईन प्रवेश प्रक्रिये बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यासाठी आय टी विभागाचे प्रमुख संतोष भोईर सर, जेष्ठ शिक्षक ए.बी.पाटील सर, इ.१० वीचे वर्ग शिक्षक दिपक वावेकर सर,एच बी पाटील, एस एम.धुमाळ, स्नेहल ठाकूर ,.शशिकला जाधव,सौ.रचिता पाटील तसेच आय.टी.शिक्षक श्री.वैभव पाटील. सौ.अपर्णा भोयर यांनी विशेष मेहनत घेतली.
या मार्गदर्शना साठी शाळेचे चेअरमन शिक्षक आमदार बाळाराम पाटील व शाळा समितीचे सदस्य प्रितम म्हात्रे यांच्या प्रेरणेतून हे मार्गदर्शन करण्यात आले असे शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.ठाकूर यांनी आवर्जून सांगितले.