Home ताज्या बातम्या महाडच्या पुरग्रस्त हजारो लोकांसाठी माणगांव मधून दररोज बनविले जाते जेवण
माणगाव :
रायगड व रत्नागिरी जिल्हयामध्ये नुकताच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड येथे महापूर व तळई गाव हे दरड कोसळून संपूर्ण जमिन दोस्त झाले असून महाड बाजार पेठेत तर २० फूट पाणी शिरल्याने सर्वत्र महाड शहर हे उध्वस्त झाले आहे. २२ जुलै रोजी पासून महाड मधील नागरीकां हे मोठ्या संकटात सापडले असताना त्यांच्या मदतीला मुंबई येथील गुरूव्दार संस्था व माणगांव तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक व बचत गट धावून एक हात मदतीचा देत आहे. अशाच प्रकारे महाडच्या पुरग्रस्त नागरीकांना नवी मुंबई खारघर मधील गुरूव्दार ही संस्था परिपुर्ण अन्न धान्याचे मोठ मोठे कंन्टेनर घेऊन माणगांव तहसील कार्यालयात दि २४ जुलै पासून सकाळी नास्ता दुपारी जेवण तसेच संध्याकाळी जेवण असे दरोरोज ४० हजार महाडच्या पुरग्रस्त नागरीकांना ते जेवण बनवून देत आहेत या संस्थेला रोज सकाळ संध्याकाळी जेवण बनविन्यासाठी मदत ही माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ करीत असून याच्यावर अहोराञ लक्ष माणगांवच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर तसेच माणगांव तहसीलदार प्रियांका आयरे व सर्व शासकीय कर्मचारी मेहनत घेत आहेत.या गुरूव्दार संस्थेचे एकूण ३० आचारी हे दिवस राञ मेहनत करत आहेत .