मुरुड तालुक्यातील पूरग्रस्तांना मनसे ने दिला मदतीचा हात

0
139

सौ.लिना बाळा नांदगावकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोर्लई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर व एकलव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात असून रायगड तसेच मुरुड तालुक्यातील आदाड,वालवटी, उसरोली,खारदोडकुळे, मजगांव,वावे-आदिवासीवाडी व मुरुड येथील पूरग्रस्त-गरजूंना सौ.लिना बाळा नांदगावकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

    सौ.लिना नांदगावकर व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पूरग्रस्त आदाड वालवटी उसरोली खारदोडकुळे मजगांव व मुरुड मधील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.यावेळी त्यांच्या हस्ते पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट,चटई, ब्लॅंकेट-चादर, कपड्यांचे वाटप करण्यात आले तर वावे-आदिवासीवाडी व उसरोली येथील गरजूंना मदत जीवनावश्यक वस्तू-भांड्यांच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.लिना नांदगांवकर,विभाग अध्यक्षा

सौ. सुप्रिया दळवी, महिला सचिव सौ. ग्रेसी सिंग,सायन-कोळीवाडा विभाग अध्यक्ष अनंत कांबळे, उपाध्यक्ष/ विभाग अध्यक्ष नंदकुमार चिले, लांजा संपर्क अध्यक्ष चंद्रकांत गुरव,मनविसे राज्य उपाध्यक्ष अविनाश किरवे, रोजगार विभाग संघटक सचिन चिकाटे, रोजगार उपविभाग संघटक दिपक कासले, रविदास वगारे, योगेश दांडेकर, अंकुश कारंडे तसेच मनसे तालुका अध्यक्ष शैलेश खोत, सचिव राजेश तरे, माजी तालुका अध्यक्ष अरविंद गायकर, तालुका उपाध्यक्ष प्रशांत भाटकर,विभाग अध्यक्ष गजानन भोईर,मुन्ना उल्डे,शाखा अध्यक्ष राहुल गोसावी,सिद्धेश खोपकर, कल्पेश तांबडे,महेंन्द्र कांबळी,स्वागत मकाजी, प्रतिक कणगी,अनिकेत आयरे,संतोष धोंड,त्रिशूल कानुगोजे यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.