स्वातंत्र्यदिनी मनसेचे पंचायत समिती कार्य कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन

0
113

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनचे काम सन 2015 – 16 या आर्थिक वर्षात वर्षात मंजूर होऊनही अद्याप पर्यंत हे काम पूर्ण न झाल्याने या कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासकीय आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सात वाजता पंचायत समिती गेट समोर ग्रामस्थ आणि मनसेच्या माध्यमातून गेट बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा आक्रमक इशारा मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रामपंचायत खोपटे गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन 2015 – 16 या आर्थिक वर्षात नवीन पाईपलाईन मंजूर झाली होती. परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी हे काम अपूर्णच ठेवले आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. ठेकेदाराने अनेक वेळा काम वेळेत पूर्ण करण्यासाठी बॉण्ड पेपर दिले आहेत. गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे अनेकवेळा याबाबत बैठक झाली.
ग्रामपंचायतीला अनेक वेळा आश्वासने दिली. तरीही अजूनही हे काम अपूर्णच आहे. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर शासकीय आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा खोपटे ग्रामस्थ आणि महाराष्ट्र निर्माण सेनाच्या माध्यमातून दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सात वाजता पंचायत समिती उरण येथे गेट समोरच गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी दिला आहे.