Home ताज्या बातम्या पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांची पनवेल मेट्रो सेंटर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून...
पनवेल : पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांची बदली झाली आहे. पनवेल मेट्रो सेंटरला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली आहे. पनवेल उपविभागीय अधिकारी म्हणून नवले यांनी पावणे चार वर्षे काम केले. कार्यक्षम कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप पनवेल-उरण मध्ये पाडली.
पनवेल उरण चे प्रांताधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर दत्तात्रय नवले यांनी अत्यंत चांगले काम केले. त्यांच्या अखत्यारीतील कामांचा निपटारा केला. सर्वसामान्य नागरिकांना त्यांना सहज भेटता येत होते. नागरिकांच्या समस्या प्रश्न ऐकून घेऊन त्याचे निराकरण ते करीत असत. ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत दाखल झालेले दाव्यांचा योग्य निपटारा करून त्यांना न्याय देण्याचे काम दत्तात्रेय नवले यांनी केले. वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन त्यांच्या कार्यकाळात मध्ये करण्यात आले. या व्यतिरिक्त पनवेल विधानसभा मतदार संघाचे ते निवडणूक निर्णय अधिकारी होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा त्यांच्या कार्य काळामध्ये झाल्या. कोरोना वैश्विक संकटात सर्व यंत्रणांना सोबत घेऊन पनवेल आणि उरण च्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूंचे संक्रमण होणार नाही याची खबरदारी प्रांताधिकारी म्हणून नवले यांनी घेतली. प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी कोरोना विषयी नागरिकांचे प्रबोधन केले. या महामारी चा फैलाव
होऊ नये या अनुषंगाने प्रयत्न केले. करंजा या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांची समजूत काढून कोरोना चाचण्या करून घेतल्या. पनवेल महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाशी योग्य समन्वय ठेवून त्यांनी कोरोना काळातील परिस्थिती हाताळली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी म्हणून विशेष प्रयत्न केले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणातही दत्तात्रेय नवले यांनी योग्य समन्वय ठेवला. त्यामुळे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लसीकरण करता आले. वृद्ध आश्रमा मधील जेष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकप्रतिनिधी बरोबर उत्तम संपर्क ठेवून दत्तात्रय नवले यांनी काम केले. पावणे चार वर्षाच्या कार्यकाळात नंतर त्यांची पनवेल मेट्रो सेंटरला उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.