Home ताज्या बातम्या ऐतिहासिक चवदार तळ्यातील गाळ व पाणी स्वच्छ करण्यासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांचे...
ऐतिहासिक चवदार तळयातील गाळ, चिखल काढून पाणी स्वच्छ करण्यासाठी व चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व जपण्यासाठी महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी आंबेडकरी चळवळीतील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त मिटींग घेतली. सदरच्या मिटींगमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांची मनोगत विचारात घेऊन तळ्यातील गाळ काढून पाणी पिण्यायोग्य करू सदरच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या या ऐतिहासिक भूमीचे जतन करू या. असे आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले. सदर मिटींगसाठी प्रांताधिकारी पूदलवाड मॅडम, तहसिलदार श्री. काशिद, दलित मित्र मधूकर गायकवाड, सजन पवार, विश्वनाथ सोनावणे, सखाराम सकपाळ, केशवहाटे, के.के. हाटे, लक्ष्मण जाधव, अशोक मोहिते, प्रभाकर खांबे, मोहन धोत्रे, विश्वास यादव, अरुण कासारे, सिद्धार्थ शिर्के, दिपक मोरे, भिमराव धोत्रे, डॉ . महेंद्र शिर्के तालुकाप्रमुख सुरेश महाडीक, संपर्क प्रमुख विजय सावंत, सिद्धेश पाटेकरआदी कार्यकर्ते उपस्थित होते.