Home ताज्या बातम्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघालेल्या गुन्हेगारास पनवेल गुन्हे शाखेने केली अटक
पनवेल : पंचवीस जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघलेल्या गुन्हेगाराला पनवेल गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले सर्व मोबाईल व मोटार सायकल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आली आहेत. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध २५ गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्याची बजावणी प्रलंबित आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बी जी शेखर पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रवीण पाटील यांनी वाहन चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरिकक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष २ च्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील व पो.हवा. सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार भिवंडी येथील अब्बास शब्बर जाफरी (वय-३४) रा. खान कंपाऊंड, शांती नगर,भिवंडी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे याबाबत सखोल चौकशी केली असताना त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदर आरोपी कडून कळंबोली, खारघर, पनवेल शहर, रबाळे, मुंब्रा, भिवंडी, टिळकनगर, कोळशेवाडी, ओदोनी टाऊन, भिवंडी, शांतीनगर, कोळशेवाडी, विठ्ठलवाडी, नारपोली, खडकपाडा, कापूरबावडी, वर्तकनगर, कोनगाव, नौपाडा, भोईवाडा याठिकाणी २५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई सपोनि प्रविण फडतरे, गणेश कराड, पो.उपनिरीक्षक वैभव रोंगे, स.फौ. साळुंखे, पो.ह.गडगे, इंद्रजित कानू, रूपेश पाटील, दीपक डोंगरे, प्रफूल मोरे, प्रशांत काटकर, अनिल पाटील, संजय पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, वाघ, सुनील कुदले, प्रवीण भोपी यांनी केली आहे.