जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची आयुक्तांनी घेतली भेट

0
146

पनवेल  : रायगड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पनवेल कार्यक्षेत्रातील विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.

गेल्या महिन्याभरामध्ये पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट झाली असली तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सर्वत्र तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी सुरू असताना पनवेल महानगरपालिकाही युध्द पातळीवर तयारी करत आहे. कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या गोदामांमध्ये 635 खाटांचे जंबो कोविड सेंटर उभारले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये सिडको याचे हस्तांतरण पनवेल महानगरपालिकेकडे करणार आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास पनवेल पालिका क्षेत्रासह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रूग्ण याठिकाणी उपचारास येण्याची शक्यता असल्याने हे जंबो कोविड सेंटर महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची आयुक्तांनी भेट घेऊन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारी विषयी महापालिका करत असलेल्या कामाची माहिती दिली. या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रश्नांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त सचिन पवार उपस्थित होते.