गणेशोत्सवाच्या सणानिमित्त पूर्वतयारी व उलवे नोडमधील विविध समस्यांबाबत सिडको बरोबर बैठक संपन्न

0
157

पनवेल : येत्या गणेशोत्सवाच्या सणानिमित्त पूर्वतयारी व उलवे नोडमधील विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंता सिडको उलवे नोड यांच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

       या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते रविशेठ पाटील यांच्या सह रोटरी उलवेचे प्रेसिडेंट शिरीष कडू, सचिन राजे,हरिश्चंद्र भगत, सचिन मोरे, अशोक जाधव,निलेश सोनवणे, शिल्पा सोनवणे, नितीन आढाव, शामराव निंबाळकर, प्रशांत कदम, संदीप पाटील, निलेश पाटील, चिरंजीव सावंत, संकेत आवटे,विनोद थोरात, शंकर साळुंखे तसेच विविध सेक्टरमधील प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वप्रथम रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर टाकणे व डागडुजी तसेच सेक्टर 2,9, 23 येथील विसर्जन स्थळी पुरेशी लाईटची व्यवस्था व निर्माल्य टाकण्याची व्यवस्था यांसोबतच पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करणे, स्मशानभूमी चालू करणे, धार्मिक प्लॉट, हॉकर्स झोन, कायमस्वरूपी पोलीस चौकी,नालेसफाई,घंटागाडी,औषध फवारणी,सांडपाणी व्यवस्था, स्ट्रीट लाईट इत्यादी विषयांवर देखील चर्चा करून संबंधित अधिकारी यांनी सदरचे विषय लवकरात लवकर सोडवण्याचे मान्य केले आहे.