मुरुड मध्ये पाऊस व वादळी वाऱ्याचे थैमान , तीन मच्छिमार नौका बुडाल्या

0
150

मुरुड :  मुरुड मध्ये सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊसाला  सुरुवात झाली , मुरुड शहर , बोर्ली मांडला , मजगाव, काशीद , शीघ्रे, खारआंबोली परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते, मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत ४७५ मिमी पाऊसाची विक्रमी नोंद झाली होती , साळाव पोस्ट जवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती, मुरुड मधील लक्ष्मिखार गावात रात्री ४ ते ५ फूट पाणी झाल्याने गावकर्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली, मुरुड तालुक्यातील भातशेतीचे राब पाण्याखाली गेले तर बऱ्याचशा शेतात रेजगा वाहून आल्याने भातशेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, मुरुड मधील एकदरा पुलाला बांधलेल्या नौकांचे दोर वादळी वाऱ्याने तुटले त्यातील संजय जंजिरकर यांची नौका किनारीच बुडाली तर एकदरा येथील धनंजय पाटील व मनोहर पाटील यांच्या नौका भरकटून पद्मदुर्ग किल्ल्यापर्यंत जाऊन बुडाल्या असून नौकेतील जाळी वाहून गेली , इंजिन खराब झाले तसेच नौकेचे केबिन तुटून इतरही सामान वाहून गेले असून एका नौकेचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाल्याचे मच्छिमार बांधव जगन्नाथ वाघरे यांनी सांगितले, सदरच्या बुडालेल्या नौका वाचवण्याची शिकस्त करताना कोळी समाज बांधव दिसत होते, मंगळवारी सकाळपासून पाऊसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.