साई निधी टोपाझ बारवर कारवाई, ३२ जणांवर गुन्हा

0
143

पनवेल : पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक महिला बीभत्स आणि अश्लील वर्तन करत आहेत. पनवेल तालुक्यातील साई निधी टोपाझ बार गुप्त पद्धतीने चालू करून शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील कोन येथे साई निधी टोपाझ बार आहे. १० सप्टेंबर रोजी टोपाझ बार विहित वेळेत बंद करून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने पुन्हा चालू केले असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. यावेळी साई निधी टोपाझ बार सुरू असल्याचे निदर्शनास आले. शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून बार मधील महिला वेटर पुरुष ग्राहकां सोबत अश्लील व वीभत्स वर्तन करत असताना मिळून आले. याप्रकरणी १४ महिला वेटर, नऊ ग्राहक आणि नऊ पुरुष वेटर मॅनेजर यांच्यासह ३२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बत्तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.