Home ताज्या बातम्या वडाळे तलाव येथे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उंचीवर असलेली केबिन बांधावी- प्रितम म्हात्रे
पनवेल : वडाळे तलाव येथे महिला व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस/सुरक्षा रक्षकांकरिता उंचीवर असलेली केबिन बांधण्याकरिता प्रस्ताव तयार करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली आहे. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सोमवारी वडाळे तलाव परिसराची पाहणी केली. वडाळे तलाव परिसरात रात्रीच्या वेळी तलावात घाण व निर्माल्य टाकत आहेत. या ठिकानी कोणताही अनुचित प्रकार घडण्यापासून थांबवण्यास पोलीस व सुरक्षा रक्षकांना उंचीवर असलेल्या केबिनची मदत होईल. या पाहणी दरम्यान नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, माजी नगरसेवक डी.पी म्हात्रे, जॉनी जॉर्ज, पालिकेचे उप शहर अभियंता संजय कटेकर, विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील, श्री.कदम, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.