Home ताज्या बातम्या दिघोडे – गव्हाणफाटा महामार्गावर अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाईची मोहीम
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील दिघोडे – गव्हाणफाटा महामार्गावर नियमितच्या वाहतुक कोंडीमुळे दैनंदिन प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.दिघोडे पासून ते गव्हाणफाट्यापर्यंत महामार्गाच्या लगत सुरू असलेले अनधिकृत कंटेनर गोदामांमधील अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळे सामान्य नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नवीमुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबर 2021 पासून सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत नवीमुंबई पोलिस आयुक्तालय परिसरात अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीला बंदी घातली आहे.त्याचे पालन न करणाऱ्या अवजड वाहनांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्या वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.दिघोडे – गव्हाणफाटा महामार्गावर दिघोडे,वेश्वि,जांभुळपाडा,वाढधोंडी खिंड या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करून महामार्ग ठप्प कारीत असल्याने तासंतास या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
त्यामुळे आत्ता नवीमुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अवजड वाहनांवर जोरदार कारवाईची मोहीम उरण वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस नाईक रविंंद्र पार्टे व पोलिस नाईक विशाल भिसे यांनी सुरू केल्याने आत्ता वाहतूक कोंडी सुरळीत होत असल्याने प्रवासी आणि सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.