Home ताज्या बातम्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त पारगाव ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान व कोव्हीड शिल्डचे लसीकरण
पनवेल : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता अभियान व कोविड सिल्डचे लसीकरण करण्यात आले महात्मा गांधीजींच्या हार घालून स्वच्छते बाबत शपथ घेण्यात आली व परिसरात स्वच्छता करण्यात आली व नंतर ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत शासनाकडून आलेल्या 150 कोविड सिल्ड चे ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच पारगाव सौ अहिल्या बाळाराम नाईक यांनी ग्रामस्थांना स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले. असे सांगितले की आपण आपला गाव स्वच्छ ठेवू या आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे बंद करू या ओला कचरा व सुका कचरा अलग अलग करून घंटागाडीत टाकावे आपले घर स्वच्छ, तर आपले गाव स्वच्छ .स्वच्छता जो करी, त्याच्या घरी लक्ष्मी वास करी. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ अहिल्या बाळा नाईक, उपसरपंच सौ अंजली राहुल कांबळे, माजी उपसरपंच मनोज राम दळवी, माजी उपसरपंच सुशील कांत तारेकर, सदस्य सौ सुनंदा हरिभाऊ नाईक, सौ निशा रत्नदीप पाटील, सदस्य विश्वनाथ पाटील, सौ बानू बाई बाबुराव म्हात्रे, विजय वाघे, सौ सोनाली करण भोईर, सौ कल्पना तारेकर, सौ शिल्पा नाईक, डॉक्टर भारती, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर मोकल, ऑपरेटर सौ सोनाली देशमुख, ऑपरेटर कौस्तुभ राऊत, प्रमोद म्हात्रे, आशा वर्कर चंद्रभागा तारेकर, देवले आदी उपस्थित होते.