पनवेल शहर पोलिसांची कपल लेडीज बारवर कारवाई

0
230

       पनवेल : पनवेल परिसरातील भिंगारी येथील कपल लेडीज बार आणि कोळखे गाव हद्दीतील आयकॉन बारवर कारवाई करण्यात आली. पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचा अभाव आणि तोंडाला मास्क न लावता अनेक जण वावरत होते. वरील नियमांचे पालन न केल्याने कोरोना या संसर्गजन्य गंभीर रोगाचा प्रादुर्भाव होतो याची माहिती असताना देखील शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून सदर बारवर कारवाई करण्यात आली. तसेच काही महिला वेटर यांचे विहित नोकरनामे नसताना देखील बारमध्ये आढळून आल्याने या ठिकाणी असलेले वेटर, महिला वेटर, बार मॅनेजर व इतर व्यक्ती असे मिळून 29 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोळखे गाव हद्दीतील आयकॉन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिरढोण येथील संग्राम ढाब्यावर सुद्धा कोरोना नियमांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे धडक कारवाई केल्यामुळे बेकायदेशीररित्या लेडीज बार चालविणार्‍यांचे व ढाबे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.