एकही ग्रामस्थ लसीपासून वंचित राहणार नाही – सरपंच शीतल सोनवणे

0
162

देवद ग्रामपंचायतीत कोव्हीड लसीकरण करण्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

   पनवेल : पनवेल  तालुक्यातील विकसित होत  असलेली  म्हणून देवद  ग्रामपंचायतीची ओळख आहे.या पंचायत हद्दीत कोव्हीड लसीकरणाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पंचायत हद्दीतील एकही ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असे सरपंच शीतल सोनवणे यांनी लसीकरण कार्यक्रम प्रसंगी सांगितले.

         शीतल सोनवणे पुढे म्हणाल्या की , देवद गाव सध्या विकसित होत आहे. एकेकाळी आड बाजूला असलेले हे गाव आता शहराच्या जवळ येऊ लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या अपेक्षा नक्कीच पंचायतीकडून वाढल्या आहेत. लस कमी पडत असल्यास आम्ही पाठपुरावा करून त्याची संख्या वाढवून घेऊ. सध्या कोव्हीडमुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले असले तरी पंचायतीकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पंचायतीला सध्या पुरेसा लसींचा पुरवठा होत नव्हता तो आता होऊ लागला आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी पंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामसेवक  धनंजय निकम प्रयत्नशील आहेत. त्यासाठी योग्य तो प्रसार आणि प्रचार केला जात आहे. त्यामुळे एकही ग्रामस्थ देवद ग्रामपंचायत हद्दीत लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण पूर्ण अशी अपॆक्षा सरपंच शीतल सोनवणे यांनी व्यक्त केली. दरम्यान देवद येथील मराठी शाळेत कोव्हीड लसीचे डोस जसे जसे उपलब्ध होतील तसे नागरिकांना कळविण्यात येतील असे ग्रामसेवक धनंजय  निकम यांनी सांगितले असून सोशल डिस्टन्स ठेऊन हे डोस देण्यात येतात असे देखील सांगितले.