रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे भवन उभारण्यात येत आहे. या नूतन वास्तूचे काम पुर्णत्वास येत आहे. या कामाची लोकेनते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ रामराजे माने-देशमुख, प्रबंधक डॉ अरुण सकटे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गणेश पाटील, विजय जाधव, सौरभ महामुनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.