
उरण : कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम करणारे, स्वच्छ चारित्र्य संपन्न म्हणून सर्वत्र सुरेश पोसतांडेल यांची ओळख असून सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. ते नगर परिषद /नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम करत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड महाराष्ट्र राज्य नगरपरिषद /नगरपंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.
दिनांक 31/10/2021 रोजी शेगाव येथे झालेल्या सभासदांच्या सर्वसाधारण सभेत कर्तव्य दक्ष कर्मचारी सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र नगर परिषद /नगर पंचायती कर्मचारी /संवर्ग कर्मचारी या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदीप रावनकर, प्रदेश सरचिटणीस पदी रामेश्वर वाघमारे व प्रदेश कोषाध्यक्ष अनिल पवार यांची नेमणूक झाली आहे. नवनियुक्त या सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी त्यांना सोशल मीडिया द्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.