ज्वालाग्राही वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षित कर्मचारी

0
145

अलिबाग : ज्वालाग्राही वायू आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर असणारे चालक आणि त्याचा सहाय्यक हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे अशी मागणी रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने संपूर्ण देशातील उपप्रादेशिक परिवहन आयुक्तांना ज्वालाग्राही वायू आणि पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चालकासोबत त्याचा सहायक असण्याबरोबर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे असे निर्देश दिले आहे ज्वालाग्राही वायू आणि पदार्थांची वाहतूक कशा पद्धतीने सुरू आहे आणि दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील आयुक्तांना दिल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबागहून पनवेलकडे जाणारा सिलेंडरने भरलेला ट्रक एमएच-04डीके-1419 याला अचानक सायलेंसरमुळे चेसी पेटू लागली, त्यावेळी त्यामार्गावरुन जाणारे आपत्ती व्यवस्थापनाचे तज्ञ मार्गदर्शक जयपाल पाटील व त्यांचे सहकारी विकास रणपिसे यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रक चालकाला कल्पना देवून ट्रकमधील अग्निशामक सिलेंडर चालवून आग विझविली व संभाव्य जिवीतहानी टाळली. ट्रक चालकाला गॅस सिलेंडर व आपत्तीचे ज्ञान असावे व चालकासोबत एक सहाय्यक कायम राहावा यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांना जयपाल पाटील यांनी विनंतीपत्र पाठविले होते. 23018/8/2012 परिपत्रकानुसार देशभरातील भारत सरकारचे अप्पर सचिव शशि भूषण यांनी देशभरातील परिवहन आयुक्तांना याची नोंद घेण्याचे सांगितले असून जयपाल पाटील यांनी केलेल्या मागणीला सिलेंडर वाहतुकीबाबत सुरक्षा संदर्भातील शिक्षण देण्याची मागणी मान्यता मिळाली.