कर्जत पोलिसांच्या दोन गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपासाबद्दल जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडून सत्कार

0
157

कर्जत : कर्जत पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात दोन जटिल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास केला होता.त्याबद्दल रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा सन्मान करण्यात आला. कर्जत पोलीस ठाण्यातील वेणगाव येथे गांजा तस्करी सुरु असल्याबाबत गुन्ह्याचा कर्जत पोलिसांनी सुरु केला होता. त्यानंतर कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने अन्य जिल्ह्यात जाऊन तपास करून आरोपींना अटक केले होते. कोणतेही धागेदोरे नसताना कर्जत पोलिसांनी केलेल्या तपासाची दखल रायगड पोलिसांनी घेतली असून १७ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित क्राईम बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा सन्मान करण्यात आला.
कर्जत पोलिसांनी दुसरीकडे कर्जत शहर आणि परिसरातील बाईक चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या दोन्ही गुन्ह्यातच जलदगतीने तपास करणाऱ्या कर्जत पोलीस ठाण्याच्या पथकाचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहायक पोलीस निरीक्षक आल्हाट, तसेच पोलीस कर्मचारी पाटील, देशमुख,कोळी, चौधरी, जमदाडे यांचा सन्मान केला.