Home ताज्या बातम्या मन हेलावून टाकणारी तळा तालुक्यात चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी अंत
तळा : तळा तालुक्यातील शेणवली येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली. काल झालेल्या वादळी पावसाने शेणवली गावाजवळ एका शेतात विजेची तार पोलावरून वरून तुटून खाली पडली होती. तार तुटून देखील त्या तारेत विद्युत पुरवठा सुरु होता. दुर्दैवाने त्याच शेतात ऋतिक यशवंत हिलम वय वर्ष दहा राहणार खाम्बोली आदिवासी वाडी हा आज सकाळी खेळण्यासाठी गेला आणि त्याचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्याचा तिथे दुर्देवी अंत झाला. या घटने संदर्भात तळा पोलिस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने सध्या संपूर्ण ताकद वसुली करण्यात लावली आहे. परंतु कंपनीचे महत्वाच्या कामांकडे अजिबात लक्ष नाही त्यांनी अश्या प्रकारच्या घटना घडू नयेत या कडे जास्त लक्ष देणे गरजेचे असून तळा तालुक्यात अशी धोकादायक शेकडो ठिकाणे आहेत ती शोधून तातडीने दुरस्ती करणे गरजेचे असून भविष्यात असे अपघात होण्यापासून बचाव करता येईल. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून हीलम कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी शेकाप तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड यांनी केली आहे.