दिवेआगरला आले पुन्हा सुवर्णदिन

0
154

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना

दिघी – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून बुधवारी ता. २३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्ह:प्रतिष्ठापना पूजा संपन्न झाली. अनेक मान्यवरांच्या उपस्थिती हा भक्तिमय सोहळा अपार पडला. यांमुळे दिवआगर मधील वैभव पुन्हा प्राप्त होणार असल्याने आता पर्यटकाच्या सख्येत देखील वाढ होणार आहे.
याप्रसंगी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भारत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधताना अजित पवार यांनी सांगितले कि, आजच्या सुवर्ण दिवसा मुळे दिवेआगर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार आहे. निसर्गाची उधळण झालेल्या कोंकणात आता पूर्णतेकडे नेण्यात येईल. यामध्ये समुद्रमार्गे जिल्ह्यात येणार मार्ग तसेच पर्यटन ला चालना देणारा बीच शॅक्स व निसर्ग पर्यटन धोरण अमलात आणून विकास साधला जाईल. दिवेआगर सरपंच उदय बापट यांनी मागणी केल्या प्रमाणे दिवेआगर ग्रामपंचायत इमारत साठी 1 कोटींची तरतूद करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच यावेळी दिवेआगर येथील दोन कोटी ची नळ पाणी योजनेचा शुभारंभ व दिवेआगर पोलीस चौकीचे उद्घाटन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ते पुढे म्हणाले कि, मुबई – गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी नितीन गडकरी देखील लक्ष देत आहेत. लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करणार. दिवेआगर मध्ये २ कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. यावेळी चोरीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेतील सरकारी वकील, पोलीस अधिकारी, मृत झालेले सुरक्षा रक्षक यांचे कुटुंब, सुवर्ण मुखवटा तयार करणारे कारागीर, इत्यादींचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सोहळ्यात सत्कार –
दिवेआगर सुवर्ण गणेशावर पडलेला दरोडा तद्नंतर तपासकामी व दिवेआगर येथील आज चा दिवस, या प्रवासादरम्यान अनेक मदत केलेल्या मान्यवरांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये न्यायलयीन विभाग, पोलीस विभाग, सहाय्य धर्माधिकारी संस्था तसेच स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला.