लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन.

0
8

उरण : लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून जो लढा गेली ४ वर्षांपासून लढा चालू आहे तो म्हणजे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला हवे. महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला नावाच्या पाठवलेल्या प्रस्तावाबाबत अजून कुठलीच सकारात्मक चर्चा नाही म्हणुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इथल्या स्थानिक नेत्यांना व मंत्रिमंडळाला सांगण्यासाठी धरणे आंदोलन हे आझाद मैदान याठिकाणी घेण्यात आले.

लवकरच मोठया आंदोलनाची तयारी चालू आहे व पुढील नियोजन लवकरच घेण्यात येईल. असे यावेळी ठरविण्यात आले.या वेळी आझाद मैदान मध्ये कृती समिती अद्यक्ष दशरथ दादा पाटील , भूमिपुत्र नेते व लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे , कृती समिती सद्यस्य व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत , पनवेल चे माजी उपमहापौर जगदीश भाई गायकवाड , कृती समितीमधील अन्य सदस्य व मुंबई ,रायगड मधून आलेले सर्व आगरी कोळी बांधव व सर्व समाजबांधव उपस्थित होते. रायगड जिल्हा व मुंबईला जोडणाऱ्या महत्वाचा सागरी मार्ग असलेल्या अटल सेतूचा मार्ग अडवून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.