Home ठळक बातम्या तरुण वर्गामध्ये आकर्षित असलेली ‘हार्ले-डेव्हिडसन X440T’ पनवेल मध्ये दाखल
पनवेल : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या हार्ले-डेव्हिडसन आणि भारतीय दुचाकी क्षेत्रातील दिग्गज हिरो मोटोकॉर्प यांच्या सहकार्यातून साकारलेली ‘हार्ले-डेव्हिडसन X440T’ ही प्रीमियम रोडस्टर बाईक आता पनवेलकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पनवेल येथील एच.एम. हिरो मोटर्स शोरूममध्ये या दमदार बाईकचा भव्य शुभारंभ भाजप नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी एच.एम. मोटर्सचे मालक सुनील सुचक, हर्षल सुचक आणि त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना एच.एम. मोटर्स प्रीमियाचे हर्षल मनोज सुचक यांनी सांगितले की, “X440T ही बाईक भारतात हार्ले-डेव्हिडसनचा अनुभव अधिक व्यापक करण्याच्या आमच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रीमियम रायडिंगची आवड असलेल्या ग्राहकांसाठी ही बाईक एक उत्कृष्ट पर्याय ठरेल.” पनवेलमधील या नवीन लाँचिंगमुळे दुचाकी शौकिनांना आता जागतिक दर्जाची बाईक स्थानिक स्तरावर उपलब्ध झाली असून, शोरूममध्ये ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.