उरण : उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘शिवस्मारक’ रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असून जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे यासाठी जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी जे. एन.पी.टी प्रशासनाकडे मागणी केली आहे.या संदर्भाचे निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण विधानसभा प्रभारी अखलाक शिलोत्री, फिशर मॅन काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष मार्तंड नाखवा यांच्या शिष्ठमंडळाने आज जे. एन.पी.टी चे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन त्यांना या बद्दल चे निवेदन दिले.उन्मेष वाघ यांनी सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सदरचे शिवस्मारक येत्या 1 डिसेंबर 2021 पासून जनतेसाठी खुले करण्याचे आश्वाशित केले आहे.जे.एन.पी.टी चेअरमन संजय सेठी यांनाहि या बाबतचे निवेदन दिले असुन त्यांचे स्वीयसहाय्यक पद्मनाभान यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे. त्यांनीहि याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिले आहे. यावेळी काँग्रेस शिष्ठमंडळाने जे. एन.पी.टीप्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. आता 1 डिसेंबर पासून शिवस्मारक सर्वांसाठी खुले होणार असल्याने दास भक्तांमध्ये, शिव भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.