नवी मुंबई : राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश व. मुळे यांची निवड झाल्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी आज येथे केली.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवनात झालेल्या बैठकीत सन 2021-2023 या वर्षासाठीच्या कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी राज्यकर विभागाचे उपायुक्त कमलेश दि.नागरे, सचिवपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, खजिनदारपदी राज्यकर विभागाचे सहायक आयुक्त सुबोध लवटे, उपाध्यक्षपदी सिडकोचे उपजिल्हाधिकारी संदीप माने, लेखा व कोषागारे सहसंचालक अनुदीप दिघे, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता ए.एस.टोपले, अधीक्षक अभियंता एस.जी.शेलार यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच महिला उपाध्यक्षपदी प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, राज्यकर विभागाच्या उपायुक्त माधवी सुर्यवंशी, लेखा व कोषागारे विभागाच्या सहायक संचालक रजनी केळकर, उपसचिवपदी सहकार विभागाचे उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, तहसिलदार दयालसिंग ठाकूर, नायब तहसिलदार माधुरी डोंगरे, प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या सहायक संचालक मिनाक्षी वैद्य, सहखजिनदार राज्यकर विभागाचे सहायक आयुक्त शरदचंद्र पोहोनकर, जनसंवाद सचिवपदी भाषा संचालनालयाचे विभागीय भाषा सहायक योगेश शेट्ये, माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय सहायक संचालक नंदकुमार वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारणीतील कार्यकारी सदस्य म्हणून प्रादेशिक दुग्धव्यवसाय विभागाचे विकास अधिकारी एच.जी.गाडवे, राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रीना फणसेकर, सा.बां.विभागाचे अधीक्ष्क अभियंता संजय बोंगे, मुंबई विभागाच्या सहायक ग्रंथालय संचालक, शालिनी इंगोले, मागासवर्गीय कक्षाचे सहा.आयुक्त विनोद खिरोळकर, अप्पर कोषागार अधिकारी, सुर्यकांत वेजरे, ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त वासुदेव पाटील, रेखा पाटकरी हे असणार आहेत.
तसेच या कार्यकारीणीला कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (पुरवठा) विवेक गायकवाड, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे संचालक महादेव नागरगोजे, राष्ट्रीय महामार्ग मंडळाच्या अधीक्षक अभियंता सु.नि.गायकवाड, सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर, ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष भरत बाष्टेवाड, राज्यकर विभागाचे सहआयुक्त रमेश जैद, नगररचनाचे सहसंचालक जि.ल.भोपळे यांचे मार्गदर्शन असणार आहे. या बैठकीस कोकण भवनमधील सर्व विभागांचे राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.