पनवेल पुरवठा विभागाच्या धडक कारवाईत बायोडिझेल सह चार टँकर हस्तगत

0
158

पनवेल : बेकायदेशीररित्या शासनाचा आदेश न जुमानता बायोडिझेल ज्वलनशिल पदार्थाची विक्री करणार्‍या दोन इसमांसह चार टँकर पनवेल पुरवठा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून जवळपास 22 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या घटनेत एक जण पसार झाला आहे.
पनवेल जवळील उलवे नोड बंबावीपाडा येथे मोठ्या प्रमाणात बायोडिझेल ज्वलनशील पदार्थाचे टँकर उभे करून त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळताच येथील पुरवठा विभागाच्या पथकाने मध्य रात्रीचा सुमारास धडक कारवाई चार बायोडिझलज्वलनशील पदार्थाने भरलेल्या टँकर वर कारवाई जवळपास 22लाख 66हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी संजयकुमार गुप्ता व श्रावण पेमईकुमार यांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. सदर कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रदिप कांबळे नायब तहसिलदार एकनाथ नाईक, कारकून हसन कामनाले, मंडळ अधिकारी, नेरे, सुनील पाटील, तलाठी आदींच्या पथकाने ही कारवाई केली असल्याने अशा प्रकारे बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.