माथेरान नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार : प्रशांत ठाकूर

0
170

माथेरान : माथेरान मध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन दिवसीय उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील हॉटेल कुमार प्लाझा मध्ये करण्यात आले. यावेळी भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी पत्रकारांसोबत झालेल्या चर्चेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात आपला पक्ष कुणाशी युती अथवा आघाडी करणार आहेत असे विचारले असता त्यांनी स्वबळावर लढणार आहोत असे स्पष्ट केले आहे.यावेळी माथेरान मधील अनेक प्रलंबित आणि महत्वपूर्ण अशा विषयावर सुध्दा विस्तृतपणे चर्चा करण्यात आली त्यास भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी सुध्दा अगदी मुद्देसूद पणे उत्तरे दिली. माथेरान मध्ये स्थानिक पातळीवर होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शक्यतो स्वबळावर निवडणूक जिंकता येणे अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे अगोदरच येथील काही पक्षांनी सुध्दा यापूर्वीच स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे पुढील काळात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची एकप्रकारे गोची होणार आहे. जिल्ह्यात भाजप सर्वंकष दृष्टीने सक्षम आहे. शिवसेनेतुन भाजपवासी झालेल्या एकूण दहा नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यावेळी नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी इच्छुक असून यावेळी माथेरानची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार होणार आहे यात शंका नाही. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी भाजपचे नेते आशिष शेलार, प्रवक्ते माधव भंडारी,केशव उपाध्ये,पनवेलच्या महापौर कविता चौतमल उरणचे आमदार महेश बालदी,निरंजन डावखरे,अविनाश कोळी,माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम पाटील,कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर,दीपक बेहेरे, राजेश भगत, रमेश मुंढे यांसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, किरण चौधरी,प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, चंद्रकांत जाधव,माजी अध्यक्ष विलास पाटील, संजय भोसले, सुभाष भोसले, राजेश चौधरी, शैलेंद्र दळवी, यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.