Home ताज्या बातम्या कामगार नेते महेंद्र घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी...
पगार वाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
उरण : प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली असतांना. उदयोगधंदे सुद्धा सांभाळणे कठीण जात आहे. अशा परस्थितीत सुद्धा कामगार नेते महेंद्र घरत साहेब यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या, व्यवस्थापन व कामगार यांची योग्य सांगड घालत कामगारांना स्वाभिमानाने जगता येईल असे प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा कोणताही परिणाम संघटनेच्या कामकाजावर झालेला नाही. महेंद्र घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी साधारणता संघटनेच्या माध्यमातून जवळ जवळ 20 ते 22 करार होत असतात.
त्याप्रमाणे जानेवारी 2021 पासुनचा हा 12 वा करार भेंडखळ येथील हिंद टर्मिनल मधील मे. पिन्याकल मारिन सर्व्हिस मधील कामगारांना तब्बल 7 हजार 500 रुपयांचा भरघोस पगारवाढ करण्यात आली. हा करार तीन वर्षाचाअसून, यामध्ये कामगारांना पहिल्या वर्षी 6 हजार , दुसऱ्या व तिसऱ्या वर्षासाठी प्रत्येकी 750 अशा प्रकारे करण्यात आला. त्याच प्रमाणे प्रत्येक कामगारास दरवर्षी 14 टक्के बोनस देण्यात येईल तसेच प्रत्येक कामगारांना 3 तीन लाख रुपयांचा मेडिक्लेम सुद्धा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कामगारांस ऐरिअसच्या रूपाने 1 लाख ते सव्वा लाख रुपये मिळतील अश्या प्रकारचा ऐतिहासिक करार काल कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कार्यालयात करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत , संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष श्री किरिट पाटील संघटनेचे संघटक योगेश रसाळ, रायगड जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशर मॅन संघटनेचे उपाध्यक्ष श्री.मार्तंड नाखवा, कंपनी व्यवस्थापनातर्फे. संतोष जैन डायरेक्टर कामगारांनच्या वतीने लंकेश ठाकूर, प्रांजल भोईर, जयेश कडू, देवेंद्र ठाकूर, हरेश ठाकूर, मनोज पाटील, सर्वेश पाटील, रविंद्र पाटील संदेश भोईर, विशाल ठाकूर, मनोज ठाकूर यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व कामगारांनी कामगारनेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांचे आभार मानले.