ही तर माझ्यासाठी तिर्थयात्रा : राष्ट्रपती रामनाथ कोंविद

0
240

राष्ट्रपतीची दुर्गराज रायगडास भेट हा ऐतिहासिक क्षण : संभाजी राजे

            किल्ले रायगड : विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते. किल्ले रायगडाला भेट देणे हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आज किल्ले रायगडाची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो. किल्ले रायगडावर येऊन मला खूप आनंद झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आभार. ज्यांनी मला येथे येण्यासाठी निमंत्रित केले असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की दुर्गराज रायगड येथे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी भेट दिली ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि गाैर वास्पद बाब आहे. रायगड किल्ल्यावरील सुरु असलेले संवर्धन आणि जतन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आपण यावे अशी आम्ही त्यांना विनंती केली हाेती. त्यास मान देत ते आज किल्ले रायगडावर आले. हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. या पुर्वीच्या देखील पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी दुर्गराज रायगडला भेटी दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी रायगड किल्ल्याचे कशा प्रकारे संवर्धन आणि जतन केले जात आहे त्याचे प्रेझेंटेशन पाहिले. त्यानंतर त्यांनी हाेळीच्या माळावरील शिवरायांचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी दुर्गराज किल्ले रायगडावर देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविदं आज नियोजित वेळी दुपारी १२ वाजता भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉफ्टरनी पाचाड येथे दाखल झाले यानंतर ते रायगड रोपवेनी रायगडावर गेले . यावेळी त्यांचे स्वागत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे रायगड विकासप्राधिकरणाचे अध्यक्ष खा . छत्रपती संभाजी राजे खासदार सुनिल तटकरे आमदार भरतशेठ गोगावले महाड पंचायत समिती सभापती सिद्धी खांबे आदीनी त्यांच स्वागत केले
दरम्यान राष्ट्रपतीचे हेलिकॉफ्टर उतरण्याच्या पाचाड या ठिकाणी पाच हेलिपॅड बनविण्यात आली होती रायगडावर होळीच्या माळावर गोल्फकार तैनात ठवण्यात आली होती त्याद्वारे राष्ट्पती शिव समाधीस्थळी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेवून राजसदरेवर महाराजांना अभिवादन केले .रायगड भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईला रवाना झाले. राष्ट्रपतीच्या सुरक्षेकरिता गड परिसर चोख पोलिस बंदोबस्तासह गडावर एस . आय टी . आणि पाचशे पोलिस कर्मचारी अधिकारी तैनात होते.
राष्ट्रपतीच्या रायगड भेटीसाठी रायगडावर दूरदर्शन आणि काही वृत्त वाहिनी प्रतिनिधी वगळता कोणत्याही वृत्त अथवा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिना गडावर अथवा गड परिसरात प्रवेश देण्यात आला नव्हता मात्र काल सांयकाळी अधिस्विकृती प्रतिनिधीना वार्ताकंण करण्याची परवानगी देण्यात आली होती स्थानिक पत्रकारांना या दौर्‍या पासून वंचित रहाव लागल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला.