Home ताज्या बातम्या बेकायदेशीररित्या वाहनांची विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड ; 9 वाहने हस्तगत
पनवेल : (संजय कदम)
अपघात झालेल्या वाहनांचे रजिस्टर नंबर आणि इंजिन नंबर बदलून त्यानंतर सदर वाहने खरी असल्याचे भासवून त्याची बिनदिक्कतपणे बाजारात विक्री करणार्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास 1 कोटी 15 लाख 50 हजार रुपये किंमतीची 9 वाहने हस्तगत केल्याने अशा प्रकारे वाहन खरेदी व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
दवलसाब हुसेनसाब काला उर्फ समीर वय 36 राहणार, कोपरखैरणे, फुरखान मजिद शेख वय 45 राहणार बांद्रा आणि दिनेश उमाशकर गुप्ता वय वय 35 राहणार घणसोली असे पकडलेल्या आरोपीचे नावे आहेत. हे तिन्ही आरोपी अपघातात नुकसान झालेल्या वाहनांची चोरी करून, वाहना वरील रजिस्टर नंबर तसेच चेसी नंबराची बदली करून वाहने खरी भासवून वाहनांची खुल्या बाजारात खुले आम विक्री करत असे, अश्या गुन्ह्याची नवी मुबई हद्दीत मोठया प्रमाणात वाढ झाली होती, असा गुन्हा देखील रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, त्या नुसार अश्या गुन्ह्याची समांतर तपासणी गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे व त्यांचे पथक हे तपास करत असताना त्या सोबत पोलीस उननिरीक्षक वैभव रोंगे आणि त्यांचे पथक तपास करत असताना काही तांत्रिक बाबींच्या आधारा नुसार आरोपी दवलसाब हुसेनसाब काला उर्फ समीर वय 36 याला अटक केली. या आरोपिकडून इको आणि इनोव्हाकार पोलिसांनी जप्त केली. या वाहनांची तपासणी केली असता मूळ चेसी नंबर आणि इंजिन नंबर खोडून बनावट चेसी नंबर आणि इंजिन नंबर पोलिसांना आढळून आली आहे. तसेच इनोव्हा कारचे इसिएम सिस्टिम बदलली असल्याचे लक्षात आले. त्या नुसार अधिक तपास केला असता त्याचे साथीदार आरोपी हे अश्या प्रकारे वाहनांच्या नंबरची अदला बदल करून वाहन विक्री करत असत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. या आरोपीवर दिल्ली आणि उत्तरप्रदेश मध्ये गुन्हे देखील दाखल आहेत. या कामासाठी हे आरोपी मुंबई, दिल्ली आणि पुणे शहरातून वाहने चोरी करून त्यात बदल करून ही वाहने ही टोळी राज्याच्या बाहेर विकत होती ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकांनी आरोपींना अटक करून आरोपी कडून 1 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची एकूण 9 वाहने त्यांनी जप्त केली आहेत या सर्व वाहनाचे सर्व नंबर आणि चेसी नंबर बदल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत.
दिनेश उमाशंकर गुप्ता वाहना साठी पैश्याची गुंतवणूक करत असे
सदरची वाहने गुन्ह्यातील अटक आरोपी दवलसाब हुसेनसाब काला उर्फ समीर वय 36 वर्ष व पाहिजे आरोपी फूरखान शेख यांच्या कडून वाहने कमी किमतीत विक्री घेऊन त्याची अधिक किमतीने विक्री करत असत, सदर वाहने खरेदी करण्यासाठी आरोपी दिनेश उमाशंकर गुप्ता पैश्याची गुंतवणूक करत होता.